पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायतचा कारभार रामभरोसे

राजेंद्र बागडे,नरखेड तालुका प्रतिनिधी 

– ग्रा.पं.चे ग्रामसेवक,ऑपरेटर गैहजर, नागरिकांना हेलपाटे  

नरखेड :- स्थानिक नरखेड तालुक्यातील जलालखेडा सर्कल अंतर्गत पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायतचा कारभार सध्या रामभोरोसे असल्याची तक्रार ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी केली आहे. पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायत ही कधीही नागरिकासाठी सुरु राहात नसून कुलूप बंद अवस्थेत असते तर येथील ग्रामसेवक,ऑपरेटर, चपराशी, कधीही ग्रामपंचायत मध्ये दिसून येत नसल्याने नागरिकांना लागणारे काही आवश्यक कागदपत्रे रहिवाशी दाखला, जन्माचा दाखला व इतरही काही आवश्यक दाखले कोण देणार कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये राहात नसल्याने नागरिकांची ओरड आहे कामे होत नसल्याने नागरिकांना चकरा मारून हेलपाटे खावे लागतात. उलट त्याना फोन केला तर मी बाहेर आहे मिटिंग ला आहे असे उडवाउडवीची उत्तर देऊन आपली बाजू छाप ठेवतात कर्मचारी हे कोणासाठी आहे आणि कशासाठी शासन यांना पगार देतो याला दोषी कोण असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. ऑपरेटर जन्म दाखल्यासाठी उगाच नागरिकांना त्रास देतो काही नावात बदल नसल्याने एपीट्यूडड करून आणायला लावतात ग्रामपंचायत स्तरावर दुरुस्त करून देता येतो पण ते कानाडोळा करून नागरिकांना उगाच त्रास देतात्त ऑपरेटर नागरिकांना बिना कामाचे त्रास देत असेल तर हे खपवून घेणार नाही नागरिकांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा ग्रामपंचायत समोरच आंदोलनाला बसेल असा इशारा पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नमाद महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Mon Oct 16 , 2023
गोंदिया :- गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित स्थानिक नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विभागातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला डॉ. बबन मेश्राम, डॉ. सुयोग इंगळे, डॉ. मस्तान शहा, डॉ.सुनील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com