नागपूर : अमर हुतात्मा हिंदू महासभेच्या वतीने राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे एक युध्द’ हा हिंदी चित्रपट दि.२६ जानेवारी २०२३ रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. राजकुमार संतोषी यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात गांधी व गोडसे या दोघांनाही आप आपली बाजु मांडण्याची संधी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गोडसेंची बाजु जी आजपर्यंत दाबुन ठेवल्या गेली होती, ती त्यांच्या न्यायालयीन वक्तव्यानुसार चित्रपटात मांडली आहे व गांधीची बाजु देखील मांडल्या गेली आहे. आम्ही आशा करतो की, नाथुरामांची बाजु हि न्यायालयीन निवेदना प्रमाणेच मांडली गेली असेल. जर या निवेदनाशी छेडछाड करून नाथुरामांना ‘खलनायक’ म्हणुन दाखविले गेले असल्यास ‘अमर हुतात्मा हिंदू महासभा’ या चित्रपटाचा तीव्र विरोध करणार व चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपटाचे खेळ बंद पाळण्यात येईल. असे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नाथुरामांची बाजु योग्य पध्दतीनं मांडल्या गेली असेल तर ती जास्तीत लोकांसमोर येईल व नाथुराम ‘राष्ट्रप्रेमी’ आहेत हे सत्य बाहेर येईल. असे असल्यास जास्तीत जास्त लोकांना हा चित्रपट पाहता यावा म्हणुन तो ‘करमुक्त’ करावा. अशी शासनाकडे मागणी निवेदनात केली आहे.