– रोटी बँक फाऊंडेशन नागपुर व्दारे विद्यार्थ्याना आरोग्यदायी व पौष्टिक आहार वितरण
कन्हान :- विकास प्राथमिक शाळा कन्हान येथे रोटी बँक फाऊंडेशन नागपुर चे चंद्र बांगरिया व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व पौष्टिक मोफत राजगिरा लाडु व शेंगदाणा चिक्की यांचे वाटप करण्यात आले. चिक्की व लडु वाटत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरती आनंद व उत्साह झलकत होता. विद्यार्थ्याने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा खाऊ खाल्ला.
याकरिता शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत व सर्वशिक्षक वृंद यांनी रोटी बँक फाउंडेशनचे आभार माणुन पुढे ही विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्य व विकासाकरिता आप ल्या कडुन अशीच मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून चंद्र बांगरिया व त्यांच्या सर्वच सहकारी मित्रांचे खूप खूप आभार व्यकत केले.