नागपूर :- नागपूर महानगरपालिका द्वारे निर्माण करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई ग्रंथालयाचे लोकार्पण समारंभ शनिवारी १ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हस्ते ग्रंथालयाचे लोकार्पण होईल. या प्रसंगी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून तर मध्य नागपूर चे आमदार विकास कुंभारे कार्यक्रमाची अध्यक्षता करतील. कार्यक्रम चिटणवीसपुरा, महाल येथे होणार आहे. यापूर्वी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते अमृत योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या गोदरेज आनंदम जलकुंभाचे लोकार्पण मॉडेल मिल चौक, गणेशपेठ बसस्टॅन्ड येथे सकाळी १० वाजता होणार आहे. दोन्ही कार्यक्रमामध्ये नागपूरचे सर्व आमदार उपस्थित राहतील.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई ग्रंथालय व जलकुंभाचे लोकार्पण आज
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com