राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट 

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली. 

यावेळी राज्यपालांनी राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली.

जेजे स्कुल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून दुसरे अधिव्याख्याता शार्दूल कदम यांचेसह ते देखील कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्व कंत्राटी तत्त्वावर कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना उडीसाच्या धर्तीवर कायम करा.

Sun Feb 5 , 2023
मुंबई :- म्युनिसिपल कामगार एकता युनियन ( सी आय टी यू ) तर्फे मुंबई येथे राज्यस्तावरील बैठक पार पडली. बैठकीला कॉ. राजेंद्र साठे व कॉ. प्रीती मेश्राम प्रामुख्याने नागपूर येथून उपस्थित होते. कोरोणा काळात कंत्राटी तत्वावर काम केलेल्या कोविड योध्याना नोकरीत प्राधान्य देण्यासोबत त्यांना कायम तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. १९ डिसेंबर रोजी नागपूर विधान सभेवर शेकडो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com