काटोल/कोंढाली :- नुकतीच रेल्वे सल्लागार समितीची बैठक रेल्वे स्टेशन काटोल येथे संपन्न झाली. मागील बैठकीमध्ये केलेल्या सूचनाप्रमाणे काही रेल्वेचे थांबे पूर्ववत झालेले आहे तसेच प्रवासी यांना सोयी करिता 3 लिफ्ट चे काम प्रगती पथावर आहेत.दक्षिण गाडी थांबावी याची आग्रही भूमिका मांडण्यात आली व दिलेल्या प्रस्तावा प्रमाणे दक्षिण गाडी थांबली नाही यावर समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली.बैठकीत रेल्वे स्थानकाचे सांगितल्या प्रमाणे सौंदर्य करण होत आहे तसेच दर्शननीय भागावर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळे बसवावे असा सुद्धा सूचना करण्यात आले. ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्यात यावी याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली त्याच प्रकारे मेमोची वेळे मध्ये सुधारणा करून जास्तीच्या मेमो या भागावर लावाव्या अशी सुद्धा सूचना करण्यात आली त्याच प्रकारे जयपूर- मैसूर जयपुर -नागपूर, जयपुर- पुरी या गाड्या काटोल रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात याची सुद्धा चर्चा करण्यात आली. केलेल्या सूचनाची लवकरच अंमलबजावणी होईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सल्लागार समितीच्या सदस्यांना सांगितले. बैठकीला मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य विजय महाजन, काटोल रेल्वे सल्लागार समिती सदस्य जितेंद्रजी तूपकर , अयुबजी पठाण, मध्य रेल्वे अधिकारी प्रदीप नागदेवते ,एस. एम पांडे तसेच काटोल स्टेशन मास्टर यश दुबे उपस्थित होते.