संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाब नगर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफ्लेक्टिंग अड्यावर धाड घालण्यात युनिट क्र 5 च्या स्थानिक गुन्हे प्रकटिकरण शाखा पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही काल सायंकाळी 5 दरम्यान केली असून या धाडीतून 13 गॅस सिलेंडर ,एक ऑटो,इलेक्ट्रिक वजन काटा,इलेक्ट्रिक गॅस भरण्याच्या दोन काड्या पिवळ्या रंगाची मशीन,नगदी 600 रुपये,एक मोबाईल असा एकूण 3 लक्ष 16 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तीन आरोपी विरुद्ध भादवी कलम 283,285,336 सहकलम 3,7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपी अटक आहेत तर एक आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.अटक दोन आरोपीमध्ये नदीम अख्तर नसीम अख्तर वय 19 वर्षे रा सैलाब नगर कामठी तसेच ऑटोचालक अश्विन बन्सोड वय 38 वर्षे रा आनंद नगर कामठी असे आहे.तर अटकेबाहेर असलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव मो ईफतेकार उर्फ गोलू असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार सदर घटनास्थळी गॅस रिफ्लेकटिंग द्वारे अवैधरीत्या ऑटो मध्ये गॅस भरण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची गुप्त माहिती परिमंडळ क्र 5 च्या गुन्हे प्रकटीकरण शाखा पोलीस पथकाला कळताच पोलिसांनी काल सायंकाळी पाच दरम्यान धाड घातले असतात यातील आरोपी इसम नदीम अख्तर नसीम अख्तर अन्सारी वय अंदाजे 19 वर्ष राहणार सैलाब नगर नवीन कामठी हे स्वतःच्या आर्थिक फायदा करिता व परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा प्रत्येक ज्वालाग्रही पदार्थ इलेक्ट्रिक मशीन च्या साह्याने गॅस वापर भरण्याचे धोकादायक अपत्य करीत असताना समक्ष मिळून आला नमूद इसमाचे कृत्य कलम 283 285 336 सह कलम 3,7.अत्यावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे असल्याने याअन्वे होत असल्याने त्याच्याविरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच घटनास्थळाहुन 13 सिलेंडर किमती 39 हजार रुपये,गॅस भरीत असलेला बजाज कंपनीचा ऑटो क्र एम एच 49 ए आर 6942 किमती अडीच लक्ष व इतर साहित्य असा एकूण 3 लक्ष 16 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ व युनिट क्र 5 चे गुन्हे प्रकटीकरण शाखाचे पोलीस निरीक्षक राहूल शिरे , पोलीस उपनिरीक्षक आशिष कोहळे व सहकारी पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.