नागपूर :-दिनांक ०४.०७,२०२३ रोजी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, नागपूर, यु. पी. कुलकर्णी यांनी त्यांचे कोर्टाने केस क्र. ३६६४/२०२२ पो. ठाणे अजनी येथील अप.क्र. ४५०/२०२२ कलम ४५४, ३८० भा. द.वी. या गुन्हयातील आरोपी आकाश जगदीश भातागडे, वय २६ वर्ग, रा. रहाटे नगर टोली अजनी, नागपुर याचे विरुद्ध साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस कलम ४५४ भा.द.वी. प्रमाणे १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, व ५००/ रु दंड, आणि दंड न भरल्यास ०३ दिवस अतिरीक्त कारावास शिक्षा. तसेच, कलम ३८० भा.द.वी. अन्वये १ वर्षे सश्रम कारावासाची शिवा, व ५००/ रु दंड, आणि दंड न भरल्यास ०३ दिवस अतिरीक्त कारावास शिक्षा ठोठावली.
दिनांक ०८.०७.२०१२ चे १०.०० वा. ते १६.३० वा. चे दरम्यान प्लॉट नं. ०९/ ए राजश्री नगर, बेलतरोडी रोड येथे राहणारे फिर्यादी अक्षय संजय भंडारे वय २३ वर्ष हे आपले घराला कुलूप लावून बाहेर गेले असता कोणी तरी अज्ञात चोराने त्यांचे घराचे दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून टी.व्ही., डिश अँन्टीना व रोख ५,००० /- रु. असा मुद्देमाल चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अजनी येथे आरोपी विरुद्ध कलम ४५४, ३८० भा.द.वी, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला दिनांक ०८.०७.२०२२ रोजी अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन पोहवा बंडु कळवे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. ओ. समोर डुंगे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. गजभीये यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा. नापोअ सुरेंद्र लव्हाळे आणि मपोअ. किर्ती फुकट यांनी काम पाहिले,