देवलापार :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवलापार येथे अप क्र. १०६/२०१८ कलम ३५४ (अ) भादवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील आरोपी नामे- नितीन मारोत शेरकर, वय ३८ वर्ष रा. रामटेक हा देवलापार येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक असून फिर्यादीच्या मुलीचा वर्ग शिक्षक होता पिडीता ही स्वतःचे घरी झोपली असता नमुद आरोपी हा घरी आला व पिडीतेला म्हणाला की तुला इंग्रजी शिकवतो असे म्हणुन घराचे छपरीत बोलावुन खाटेवर बसवून आरोपीने पिडीतेचा विनयभंग केला.
सदर प्रकरणाचे तपास सपोनि. सुरेश मट्टामी पो.स्टे. देवलापार यांनी करून सदर प्रकरण न्यायप्रविष्टाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक २८/०४/२०२३ रोजी कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. जयस्वाल नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ८ पोक्सो मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रु दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, कलम ४५२ भादवि मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व ३०००/- रु. दंड दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी. खापर्डे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून पोना प्रकाश जावरकर पो.स्टे. देवलापार यांनी मदत केली आहे..