उमरेड :- पो.स्टे. उमरेड- फिर्यादी / पिंडीता वय ३५ वर्ष यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे अप. क्र. ७८/२०१९ कलम ३०४(अ), ३४ भादवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही घरासमोरील शाळेच्या पटांगणात तिच्या सोबतच्या मुलींसोबत खेळत असतांना आरोपी नामे- सतीश उर्फ सदाशिव सहारे, वय २४ वर्ष, रा. मंगळवारी पेठ उमरेड २ यांनी पिडीत मुलगी हिला संडास कुठे आहे या बहाण्याने हाथ पकडुन नेले. पिडीत मुलीच्या मैत्रिणीने फिर्यादीला जावुन सांगितले की, आरोपीतांनी पिडीत मुलगी हिला संडास कुठे आहे या बहाण्याने हाथ पकडुन संडास खोलीत घेवुन गेले व तिचा विनयभंग केला.
सदर प्रकरण्याचे तपास सपोनि लोणे यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले.
आज दिनांक २७/०४/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे त्रिवेदी सा. नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ३५४(अ) (१) भादवि मध्ये ०२ वर्ष सश्रम कारावास व १०००/- दंड दंड न भरल्यास ०१ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी राऊत यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून पोना / ४८७ माधव काळे पोस्टे उमरेड यांनी मदत केली आहे.