मुंबई :- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वार्षिक दैनंदिनी, प्लॅनर-2025 व सेवाभरती विनियम पुस्तकाचे प्रकाशन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाले.
यावेळी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, मुख्य अभियंता सुनील सूर्यवंशी, किशोर गरुड, भूषण बल्लाळ, कंपनी सचिव विनीता श्रीवाणी, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) नागसेन वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजू गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, उपमुख्य सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी किशोर पाटील, प्रशांत गोरडे, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नितीन कांबळे, अभय रोही, शिष्टाचार अधिकारी सतीश जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, रेणुका नाटके उपस्थित होते.
याप्रसंगी महापारेषण कंपनीच्या ब्लॉग व लिंक्डइन या सोशल मीडियाचे अनावरणही डॉ. संजीव कुमार यांनी केले. विनाअपघात सेवा बजावल्याबद्दल संजय भगत व कमलेश यादव यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी केले.
महापारेषणचा जनसंपर्क विभाग आघाडीवर
महापारेषण-2025 च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेला पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने सर्वोत्कृष्ट तीन पुरस्कार मिळाले. तसेच पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ॲन्ड पीआर व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने कंपनीचा स्वतंत्र https://mahatransco.blogspot.com/ ब्लॉग सुरु केला आहे. नोकरभरतीच्या जाहिराती व अपडेट माहितीसाठी https://www.linkedin.com/in/maha-transco/ हा लिंक्डइन प्लॅटफॉर्मही सुरू केला आहे. वेबसाईटसह एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेडस, युट्यूब, टेलिग्राम चॅनेलसह सर्वाधिक सोशल मीडियावर असणारी महापारेषण ही पहिली कंपनी ठरली आहे. महापारेषणचा स्वतंत्र पॉडकास्ट चॅनेलही लवकरच सुरू होणार आहे.