विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका-२०२४’चे प्रकाशन

नागपूर :- नैसर्गिक आपत्ती काळात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी विभागीय, जिल्हा तसेच तालुकास्तरावर कार्यान्वित विदर्भातील सर्व जिल्ह्यातील यंत्रणांचा समन्वय दूरध्वनीच्या माध्यमातून सुलभ होण्याच्या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका-2024’ चे प्रकाशन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दूरध्वनी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक केतन लाड यावेळी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेद्वारे नैसर्गिक आपत्ती काळात विविध हानी टाळण्यासाठी नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया , वर्धा व गडचिरोलीसह अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यान्वित यंत्रणांचे दूरध्वनी देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधने सोईचे होणार असून संपर्कासाठी तत्काळ दूरध्वनी उपलब्ध होणार आहे. ही पुस्तिका ऐनपावसाळ्यापूर्वी सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल बिदरी यांनी माहिती विभागाचे कौतूक केले आहे.

या पुस्तिकेत अमरावती व नागपूर विभागातील आपत्ती नियंत्रण कक्ष व यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नियंत्रण कक्ष मुंबईसह, प्रसार माध्यमे आदींचे दूरध्वनी क्रमांक समाविष्ट आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती काळात घ्यावयाच्या विविध खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंबाझरी धरण बळकटीकरणाची अल्प मुदतीची कामे पूर्ण, विविध यंत्रणांनी विभागीय आयुक्तांना सोपविला अहवाल

Sat Jun 22 , 2024
नागपूर :- अंबाझरी धरणाचे मातीबांधकाम, क्रेझी कॅसल परिसरातील नदी खोलीकरणासह अन्य कामे, अंबाझरी धरणाच्या सांडव्याचा विसर्ग वाहून जाण्यासाठी पुल तोडणे आदी पावसाळयापूर्वी करायच्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे पूर्ण झाले असून यासंदर्भातील अहवाल संबंधित यंत्रणांनी आज उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना बैठकीत सोपविला. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com