नागपूर :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री भुसे यांचे मुंबई येथून सकाळी 7.30 वाजता आगमन होईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता समृद्धी महामार्गाची पाहणी करतील व नंतर त्यांचे नाशिककडे प्रयाण होईल.