संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी मौदा विधानसभा मतदारसंघातून 41 हजार मतांची आघाडी घेऊन आमदारकी साठी विजयश्री झालेले राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या नागरी व प्रशासनिक समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी कामठी शहरासाठी 9 मार्च ला सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संघ मैदान कामठी येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा या जनसंवाद सभेत कुणीही समस्याग्रस्त नागरिक समस्या निवारण पासून वंचीत न राहावे यासाठी ज्या नागरीकांच्या काही समस्यां असतील त्या नागरिकानी 7 मार्च 2025 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात कामठी तहसील कार्यालयात जमा करावे असे आवाहन कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.