पारशिवनी:- पोलीस स्टेशन पारशिवणी अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने जिल्हा परिषद बेसिक शाळा पारशिवणी येथील विद्यार्थ्यां सोबत प्रभातफेरी काढण्यात आली तसेच पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन त्यांना पोलीस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक राहुल सोनवने यांनी उपस्थित मुलाना कामकाजाबाबत व शस्त्र बाबत माहिती सांगण्यात आली
व शहरातील शाळकरी विद्यार्थांची भेट घेऊन पोलिसांचे कर्तव्य, जबाबदारी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा तसेच शस्त्र संचालनाची माहिती मंगळवारी (३ जाने) ला पारशिवनी पोलिस स्टेशन परिसरात पोलिस स्थापना दिनाच्या पर्वावर विद्यार्थ्यांना दिली. जि.प. बेसिक प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांना यावेळी पोलिस व त्यांचे कर्तव्य, जबाबदारी, कायदा सुव्यवस्था इतर बाबतीत यथायोग्य माहिती देणयात आली.
पोलिसांचे शस्त्र विद्यार्थ्यांना दाखवून गुन्ह्यातील आरोपीला पकडून कशाप्रकारे कारवाई केली जाते, दंगा भडकल्यास काय उपाय केले जातात, दंगा नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा कसा व केव्हा वापर केला जातो. सुरक्षेचे उपाय, महिला सुरक्षा या व इतर बाबतची माहिती पो.नि. राहुल सोनवने यांनी पोलिस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दिली
या प्रसंगी शाळेतील शिक्षक पोलिस विभागाचे कर्मचारी हजर होते .