‘पौर्णिमा दिवसा’निमित्त व्हेनू कॉर्नर परिसरात जनजागृती

एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार व शहराचे माजी महापौर श्री. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून पौर्णिमा दिवस अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून आज मानेवाडा रोड वरील व्हेनू कॉर्नर परिसरात जनजागृती करण्यात आली.

जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टिम लिडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पार्थ जुमडे, काजल पिल्ले या संपूर्ण चमूद्वारे जनजागृती कार्य करण्यात आले त्यांना मनपाचे प्रकाश रुद्राकार, शेखर पवार, राजू ढेंगे, दत्तू सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भक्ती मार्ग हाच सर्वात श्रेष्ठ मार्ग -पंडित आशिषकुमार शर्मा

Thu Jan 12 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जीवनात जो भक्ती करत नसेल त्याचे जीवन व्यर्थ आहे त्यासाठी सर्व सुख जरी असेल तरी त्याला भक्ती मार्गाची जोड लावणे आवश्यक आहे तरच जीवन सार्थकी लागेल.भक्ती करत असताना सुद्धा भरकटत जाऊ नका.भक्ती केल्याने कुटुंबात आनंद व सुसंस्कृत पिढी निर्माण होते म्हणूनच प्रत्येकाने जीवनात कथावाचन करणे गरजेचे आहे असे मत कथा व्यास पंडित आशिष कुमार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com