‘पौर्णिमा दिवसा’निमित्त देवनगर चौक परिसरात जनजागृती

– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर :– नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार व शहराचे माजी महापौर अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून पौर्णिमा दिवस अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून मंगळवारी 5 जुलै रोजी देवनगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शक माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी यावेळी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पार्थ जुमडे, तुषार देशमुख या संपूर्ण चमूद्वारे जनजागृती कार्य करण्यात आले.

जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

यावेळी मनपाचे राजू राठोड, विप्लव भगत, शुब्रत नंदलाल, भोलानाथ सहारे, गुरमीत सिंग, अनिल झोडे, अपूर्वा डे, विष्मय फुले, सुधीर कपूर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जि.प.स्कूल में सरपंच के हाथों गणवेश का वितरण 

Wed Jul 5 , 2023
कोदामेंढी :- अरोली-कोदामेंढी जि.प.क्षेत्र अंतर्गत आनेवाले अरोली के जि.प. स्कूल में शाला पूर्वतयारी मेलावा क्रमांक 2 ,4 जुलाई को संपन्न हुआ.इस अवसर पर सरपंच रोशनी प्रशांत भूरे इनके हाथों छात्राओं को मुफ्त गणवेश एवमं पाठ्य पुस्तकें वितरित की गई. दरम्यान नया शिक्षा सत्र शुरू होते ही पहिली कक्षा में आने वाले छात्राओं की संख्या देख सरपंचा रोशनी भुरे ने समाधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com