‘पौर्णिमा दिवस’ निमित्त मंगलमूर्ती चौकात जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.१८) रात्री मंगलमूर्ती चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव, तुषार देशमुख, पार्थ जुमडे, पिनाकी बनिक आदींनी परिसरात जनजागृती केली. यावेळी मनपाचे विप्लव भगत उपस्थित होते.

या अभियानाला मंगलमूर्ती चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मॉरिश कॉलेज नागपुर येथे संविधान पुस्तकांचे विध्यार्थ्यांना निशुल्क वितरण आणि संविधान गौरव परिक्षेचे आयोजन

Tue Oct 22 , 2024
Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com