– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (ता.३१) धरमपेठ मधील महर्षी वाल्मिकी चौक (कॉफी हाउस चौक) परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी महापौरपदी असताना पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात केली होती.
मंगळवारी जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवित जनजागृती कार्य केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पार्थ जुमड, देवयानी बागमार आदींनी जनजागृती केली. त्यांना परिसरातील नागरिक भोलानाथ साहारे, सुधीर कपूर, श्रीकांत तिवारी, बसंत देशराज आदींनी सहकार्य केले.