आंतरराष्ट्रीय अमंली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

नागपूर :- २६ जुन “आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन” म्हणून संपूर्ण जगभर पाळल्या जातो. पोलीस आयुक्तालय नागपूर शहरातर्फे “आंतरराष्ट्रीय अमंली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन रविंद्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे संकल्पनेतुन “एकत्र येवुया नशामुक्त नागपुर घडवुया” अभियानाची सुरूवात पोलीस आयुक्तालय नागपुर शहर, प्रकृती ट्रस्ट, मैत्रीय फाऊन्डेशन व युथ ऑर्गनायझेशन यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस भवन, ऑडोटिरीयम हॉल येथे दिनांक २६.०६.२०२३ ये ११.०० वा. ते १५.०० वा. दरम्यान  अश्वती दोर्जे मा. सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे अध्यक्षतेखाली व संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शिवाजी राठोड अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग), प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (दक्षीण प्रभाग) यांचे प्रमुख उपस्थीतीत करण्यात आली.

या प्रसंगी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, गुन्हेशाखा यांनी केले. मैत्रीय फाऊडेशन ग्रुपतर्फे अर्मली पदार्थाचे सेवनामुळे होणारे दुष्परीणाम यावर मार्गदर्शनपर पथनाट्य सादर करण्यात आले. अल्कोहोलीक अनॉनिमस संघटनेचे पुर्नवसित व्यक्तींनी त्यांचे मनोगत व्यक्त करून त्यांचे अनुभव कथन केले. अध्यक्ष व प्रमुख उपस्थीतांनी पुर्नवसित व्यक्तींना पुष्प व मिठाई देवुन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमा अंतर्गत स्लोगन कॉम्पीटिशन मध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे वितरीत करण्यात आली.

अध्यक्षा अश्वती दोर्जे यांनी “एकत्र येवुया, नशामुक्त नागपुर घडवुया” या अभियानाचे मुळ उ‌द्दीष्ट अंमली पदार्थाच्या घातक नशेपासुन व व्यसनापासुन नागपुर शहराला नशामुक्त करण्याचे असल्याचे सांगीतले. अध्यक्षांनी अमंली पदार्थाचे सेवनामुळे व्यक्तीचे शरीरावर, त्यांचे परीवारावर, समाजावर होणारे दुष्परिणाम युवा वर्गामध्ये व्यसनामुळे वाहती गुन्हेगारी व त्यांचे आयुष्यावर होणारे परीणाम समजावुन मार्गदर्शन केले. व उपस्थीत सर्वांना अमली पदार्थाचे सेवन न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सर्वांनी नशामुक्त समाज घडविण्याची प्रतिज्ञा घेतली. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, गुन्हेशाखा यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यकमा करिता नागपुर शहर पोलीस दलातील पोलीस उप आयुक्त निमीत गोयल, श्वेता खेडकर, अनुराग जैन, राहुल मदने, गोरख भामरे, विजयकांत सागर, निकेतन कदम, व सर्व सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस निरीक्षक, तसेच, मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंदाचे संचालक रविंद्र पाध्ये, तुषार नातु तसेच, प्रकृती ट्रस्टचे जॉन व त्यांची टिम, युथ ऑर्गनायझेन, अल्कोहोलीक अॅनॉनिमस संघटनेचे पदाधीकारी, समाजसेवी सदस्य, आर.एस.पी. चे विद्यार्थी व शाळा कॉलेज येथील विद्यार्थी आणि इतर मान्यवर हजर होते.

आंतरराष्ट्रीय अमंली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त पोलीस भवन येथे अंमली पदार्थ विरोधी प्रदर्शनी तसेच वाहतुक नियमाचे पालन करणे बाबत प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आलेले असुन नमुद प्रदर्शनी सर्व नागरीकांकरीता सुरू राहील. तसेच, आकाशवाणी केंद्र व एफ.एम. रेडीओ द्वारे दिवसभर वेळोवेळी अंमली पदार्थाचे सेवनाचे दुष्परीणाम बाबत संदेश प्रसारण करण्यात येनार आहेत.

पोलीस आयुक्तालय, नागपुर शहर मधील विविध पोलीस ठाणे स्तरावर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करीता विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत गोकुलपेठ बाजार चौकी, पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत व्हि. एम.व्ही. कॉलेज येथे तसेच, पोलीस ठाणे अजनी ह‌द्दीत मित्र नगर येथे साहस व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र यांचे माध्यमातुन जनजागृती कार्यक्रम तसेच, पोलीस ठाणे बेलतरोडी ह‌द्दीत अर्जुन पार्क बेलतरोडी येथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्र द्वारा संचालीत रिलीफ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र यांचे संयुक्त माध्यमातुन जनजागृती कार्यक्रम पेण्यात आले. पोलीस ठाणे वाठोडा ह‌द्दीत नारायणा स्कुल येथील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ बाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले. इतरही पोलीस ठाणे मध्ये अंमली पदार्थ बाबत जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Thu Jun 27 , 2024
कळमेश्वर :- पो. स्टे. कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता मिळालेल्या माहितीनुसार मौजा फेटरी राज नर्सरी चे समोर स्टाफने पोहचुन महेन्द्रा बोलेरो पिकअप गाडी क्र. एम. एच-४९/डी-३१८० बी पाहणी केली असता मागील डाल्यामध्ये एकुण ०९ गोवंश ज्यात ०५ वैल, ०३ गोरे, व ०१ गाय असे असून त्यांच्या तोंडाला व पायाला दोरीने बांधुन, त्यांना चारा पाणी न देता दाटीवाटीने, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com