नागपूर :- हिल इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) व महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अनिल बोंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष शशांक चतुर्वेदी व प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित आमदार उमेश यावलकर, चरण सिंग ठाकूर, रवी राणा यांची उपस्थिती राहतील.
महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल यांच्या वतीने येत्या 14 डिसेंबर रोजी, जाहीर आवाहन एकात्मिक किड व्यवस्थापन जनजागृतीचा कार्यक्रम आय एम ए हॉल, पुसला रोड, वरुड, जि. अमरावती येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता. कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा. असे आवाहान डॉ. सतीश ढोके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.