संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधि 9 एप्रिल – आनंद नगर कामठी येथील अत्यंत गरीब महिला जिच्या कडे घरा च्या नावावर चार टिनपत्रे,ना घर टैक्स बिल, ना आधार कार्ड, ना राशन कार्ड, ना लाईट बिल, ना बैंकेत जनधन खाता आहे ,ती चार घरी पडेल ते काम करून मजदूरी करुन उदरनिर्वाह करते तिला नुकतेच राशन कार्ड देण्यात आले .
कोठारी गैस गोदाम आनंद नगर येथे राहणाऱ्या महिला इंदिरा रामसिंग उइके वय 45 ला फेब्रुवारी मधे साप चावलयाने अत्यस्वस्थ झाल्याने लोक वर्गणी करून मेयो हॉस्पिटल नागपुर येथे उपचार करण्यात आले होते.
महिलेच्या पतीचे निधन आधीच झाले असून एक तरुण मुलगा साप चावल्या ने काही वर्षा पूर्वी मरण पावला सध्या निराधार महिला दिव्यांग मुलासह राहत आहे.
भाजपा प्रभाग 15 चे जनसेवक उज्वल रायबोले यांनी भाजपा स्थापना दिवस निमित्त निराधार महिला इंदिरा उइके ला राशन कार्ड बनवून देण्यात आले.या वेळी विक्की बोंबले,बालकदास सिंगाडे, दिलीप तिरपुड़े,विशाखा चौधरी उपस्थित होते.