अरोली :- चाचेर – निमखेडा जि प सर्कल, गट ग्रामपंचायत भेंडाळा अंतर्गत येणाऱ्या मांगली गोसाई येथील पाचशे वर्ष जुन्या व जीर्ण झालेल्या हरिनाथ बाबा शिव मंदिराच्या उद्धार करण्यासाठी शासकीय निधी देण्याची मागणी मौदा येथील महसूल मंत्री बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात मांगली गोसाई येथील नागरिकांनी केली आहे.
मांगली गोसाई येथील हरिनाथ बाबा शिव मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांची गर्दी असते. परिसरात हे एकमेव शिवमंदिर असून, पाचशे वर्षे जुना असल्याने जीर्ण झालेला आहे. जीर्ण झालेल्या या धोकादायक या मंदिराचे तातडीने जीर्णोद्धार करण्यासाठी शासकीय मदत द्यावी, या मंदिराला यात्रा स्थळ घोषित करावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मौदा येथील जनसंवाद कार्यक्रमादरम्यान मांगली गोसाई येथील नागरिक देवराव ठोसरे ,जितू समर्थ, बाबूलाल कवडे ,नामदेव हटवार, हेमराज समर्थ, मिथुन समर्थ, धर्मेंद्र लिल्हारे, सौरभ हटवार, आकाश समर्थ, विनोद ठोसरे हेमराज समर्थ, प्रवीण समर्थ, उमेश शेंडे ,बिजू भैय्या सह समस्त ग्रामवासीयांनी केली आहे.