संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधिन करा आणि बीटी अँक्ट १९४९ रद्द करण्याची मागणी
कन्हान :- शहरात सर्व बौद्ध संघटना आणि बौद्ध अनुयायींनी बौद्धगया येथे ऐतिहासीक पवित्र महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधिन करण्याची आणि बीटी अँक्ट १९४९ रद्द करण्याची मागणी निवेदनातुन कर ण्यात आली आहे.
शनिवार (दि.८) ला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते कन्हान पोलीस स्टेशन पर्यंत बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह, समता सैनिक दल, समस्त उपासक /उपासिका बौद्ध समाज बांधव कन्हान,कांद्री द्वारे निर्देशन रैलीची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भदंत नाग दीपांकर महाथेरो यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान ते पोलीस स्टेशन कन्हान पर्यंत निर्देशन रैली काढण्यात आली.
या निर्देशन रैली मध्ये हातात तिरंगा ध्वज, पंचशील ध्वज, निळा ध्वज, पांढरे वस्त्र परिधान करून महिला, पुरुष आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी यावेळी चलो हम सब एक, चलो बुद्ध की ओर, महाबोधी विहार मुक्त ब्राह्मण व्यवस्थेतुन मुक्त झालेच पाहिजे, बौध्दांना स्वतःचा महाबोधी विहार व्यवस्थापन हक्क मिळलाच पाहिजे, सन १९४९ चा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द झालाच पाहिजे, बौध्दांना स्वनिर्णयाचा हक्क मिळलाच पाहिजे, महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात दिलेच पाहिजे अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार जगातील करोडो-करोडो लोकांच्या आस्थेचे केंद्र आहे.परंतु बौद्धगया टेंपल अँक्ट १९४९ च्या माध्यमातुन अनेक वर्षांपासुन हिंदु समाजातील महंताचा कब्जा असल्याने बी टी कायदा १९४९ तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. २५०० पेक्षाही अधिक वर्षापासुन हे एक प्रमुख बौद्ध तिर्थस्थान आहे. याच ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना बोधि वृक्षाखाली उच्चतम ज्ञान प्राप्त झाले आणि बुद्धत्व प्राप्त झाले. महाबोधी महाविहार, भारतातील सर्वात जुन्या बौद्ध महाविहारांपैकी एक आहे. मौर्य सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व २६० ते २५० दरम्यान भव्य महाविहार, चैल वेदिका, स्तुप यांची निर्मिती केली तरी भारतीय संविधानाच्या आर्टिकल १३, २५ व २६ अनुसार सर्व धर्माच्या अनुयायांना आपले धार्मिक विधीला धर्मानुसार पार पाडण्याचे अधिकार, तेथील संपतीचे नियंत्रण धर्मावलंबियाना दिलेले असल्याने बी टी काय दा १९४९ रद्द करावा अशी मागणी पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली. यावेळी निर्देशना रैलीत भदंत के.सी.एस लामा सह डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती कन्हान, समता सैनिक दल कन्हान, कन्हान-कांद्री व परिसरातील मोठया संख्येने उपासक,उपासिका बौद्ध अनुयायी आंदोलनात सहभागी झाले होते.
भारत देशात अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती आहेत. देशातील सर्व समाजाच्या आराध्य दैवतां चे पवित्र मंदिर त्यांच्या ताब्यात आहेत. तसेच हिंदु चे पवित्र मंदिर हिंदुच्या ताब्यात आहेत, मुस्लीम समाजा च्या पवित्र मस्जिदी मुस्लिम बंधुच्या ताब्यात आहेत, शिखांचे गुरुद्वारे शिखांचा ताब्यात आहेत. चर्च ख्रिश्च नांच्या ताब्यात आहेत. असे देशातील प्रत्येक धर्माचे देवस्थान त्यांच्या ताब्यात आहेत. मग बौद्धांचे महाबो धगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही ? असे निवेदात नमुद केले आहे. निवेदनाची प्रत महा महीम राष्ट्रपती भारत सरकार, प्रधानमंत्री, महामहीम राज्यपाल बिहार सरकार, मुख्यमंत्री बिहार राज्य पटना, जिल्हाधिकारी नागपुर, खासदार रामटेक लोक सभा यांना पाठवली आहे.