नागपूर :- ब्रजभूषण शरण सिंग व संदीप सिंग यांना अटक करा, महिलांवरील लैंगिक अत्याचार व हिंसाचार बंद करा या मागण्यांना घेऊन राष्ट्रीय विरोध दिवसाच्या आवाहनावरून सीटू, किसान सभा, शेतमजुर यूनियन, जनवादी महिला संघटना, डी वाय एफ आय, एस एफ आय या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. निदर्शकांना संबोधित करताना सिटूचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद ताजुद्दीन व जिल्हा सचिव दिलीप देशपांडे यांनी ब्रजभूषण शरण सिंग व संदीप सिंग या दोघांवर लैंगिक अत्याचारांचे आरोप बघता ताबडतोब येणे त्यांना अटक करण्याची मागणी केली. ऑलिंपिक विजेते व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अनेक दिवसांपासून या दोघांवरही येऊन शोषणाचे आरोप लावत असून गेल्या अनेक दिवसापासून ते जंतर-मंतरवर आंदोलन करीत आहेत.
पण मोदी सरकार यावर काहीही कारवाई करत नसल्याने जनतेला त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करावे लागेल असे आवाहन या दोघांनी केले. १८ मे गुरुवार च्या कार्यक्रमात प्रसिद्ध सागरी जलतरणपटू ईश्वरी वाटकर, विजया जांभुळकर, अंजली तिरपुडे, प्रीती मेश्राम, शालिनी राऊत, राजेंद्र साठे, कृणाल सावंत, चंद्रकांत बनसोड, विठ्ठल जुनघरे, मंगला जाळेकर, विश्वनाथ असाई, अनिल ढोकपांडे, गुरुप्रीत सिंग, रामेश्वर चरपे आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला.