संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्म अनित्यांचे दैवत नबी यांच्या बद्दल जे वाईट उदगार काढले त्याचा निषेध करण्यासाठी काल कामठी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे पूर्व महासचिव मो इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन वर शांतीपूर्ण मोर्चा नेत पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्याशी भेट घालून रामगिरी बाबा वर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदित करण्यात आले.दरम्यान मौलाना सलमान अजहरी साहाब यांनी म्हटलेल्या एका शायरी संदर्भात रासुका अंतर्गत कायदेशीर कारवाही करण्यात आली तर दुसरीकडे मुस्लिम समाजबांधवांचे पैगंम्बर मोहम्मद स.अ.व. बद्दल आक्षेपार्ह उद्गार केल्या नंतरही रामगिरी बाबा होत नसलेल्या कारवाही चे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तेव्हा रामगिरी महाराज यांचे वादग्रस्त बोलणे कदापिही सहन केल्या जाणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली.
याप्रसंगी मोठ्या संख्येत मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.