अमरदिप बडगे,प्रतिनिधी
वॉर्डातील रस्त्यांवर जमा असतो सांड पाणी.
अन्यथा नगर पालिका अधिकारी व कार्यालयात फेकणार सांड पाणी
गोंदिया :- गोंदिया शहरातील नगर पालिकेचा भोंगळ कारभार असल्याचे अनेक वॉर्डात पाहायला मिळते मात्र अनेकदा नगर पालिकेला निदेन दिले. जातात मात्र नगर पालिका कोणतेही काम करत नसल्याने शहर वासियांच्या मनात मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. यालाच पहाता गोंदिया शहरातील शास्त्री वॉर्ड येथील नागरिकांनी नगर पालिका च्या विरोधात मुंडन आंदोलन करत नगर परिषद च्या विरोधात आपला रोष वैक्त केले आहे.
गोंदिया नगर पालिके मध्ये मागील सहा महिन्या पासून प्रशासक बसले आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण साफ सफाई कडे नजर ठेवण्याची जवाबदारी नगर पालिके कडे आहे, मात्र नगर पालिके कडून गोंदिया शहरातील नाली, नाले सफाई करण्यात येत नसल्याने शहरातील अनेक नाल्या सांड पाण्यानी भरल्याने तोच सांड पाणी आता रस्त्यांवर येत असुन याच सांड पाण्यातून लोकांन सह शाळकरी विद्यार्थी ना देखील या सांड पाण्यातून ये-जा करावे लागत आहे. त्यामुळे याचा त्रास मोठ्या प्रमाणात लोकांना होत. असल्याने शास्त्री वॉर्ड येथील महिला, पुरुष लोकांनी रस्त्यावर येत मुंडन आंदोलन करत नगर पालिकाचा लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलन नंतर हि नगर पालिका लक्ष दिले नाही तर नगर पालिकेच्या अधिकारी व नगर पालिकेत कार्यालयात सांड पाणी फेकण्याचा आव्हान वॉर्ड वासियांनी दिला आहे.