प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद

– मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना : मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी दिली भेट

नागपूर :- महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोनमध्ये प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सर्व केंद्रांना लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी अर्ज स्वीकृती केंद्रांना भेट देऊन लाभार्थी महिलांशी संवाद साधला.

मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगलवारी झोन कार्यालय आणि झोन अंतर्गत संचालित झिंगाबाई टाकळी मनपा शाळेतील अर्ज स्वीकृती केंद्राची पाहणी केली. तसेच त्यांनी आशीनगर झोन कार्यालय आणि झोन अंतर्गत राणी दुर्गावती मनपा शाळेतील केंद्राची पाहणी केली. त्यांनी तिथे कर्मचाऱ्यांशी आणि अर्ज जमा करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांना अर्ज जमा करण्याबद्दल माहिती विचारली आणि काही सूचना केली.

याप्रसंगी उपायुक्त डॉ रंजना लाडे, सहायक आयुक्त अशोक घरोटे, हरीश राऊत, समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार, प्रमोद खोब्रागडे, झोनचे अजय परसाटवर, राजेंद्र भांडारकर, रोशन जांभुळकर उपस्थित होते. झोनच्या सहायक आयुक्तांनी देखील आपल्या झोनमधील केंद्रावर जाऊन पाहणी केली.

महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नागपूर महानगरपालिकेचे सर्व प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र आज शनिवार १३ जुलै रोजी सुरू ठेवण्यात आले. पहिल्याच दिवशी या केंद्रांवर लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी १४ जुलै रोजी देखील सर्व केंद्र सुरू राहणार आहेत. प्रत्येक झोनमध्ये चार प्रभाग असून प्रत्येक प्रभागामध्ये एक केंद्र सुरु करण्यात आले आहे. योजनेच्या सर्व महिला लाभार्थींनी अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. ‘नारी शक्ती दूत’ ॲपवरूनही महिलांना स्वत: अर्ज करता येईल.

मनपाच्या दहाही झोनमध्ये आतापर्यंत एकूण ९२१० अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये ७५६२ अर्ज ऑफलाईन तर १६४८ अर्ज आनलाईन जमा करण्यात आले. तसेच विधानसभा निहाय आंगणवाडी येथे ३५१३५ अर्ज जमा झाले आहे. दोन्ही मिळुन ४४३४५ अर्ज जमा करण्यात आले आहेत.

येथे जमा करा अर्ज

लक्ष्मीनगर झोन

प्रभाग क्रमांक १६ : मनपा समाज भवन, गजानन नगर, नागपूर

प्रभाग क्रमांक ३६ : मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र पांडे लेआउट, नागपूर

प्रभाग क्रमांक ३७ : बुध्द विहार, कामगार कॉलनी, नागपूर

प्रभाग क्रमांक ३८ : मनपा समाज भवन, प्रगती सोसायटी, जयताळा, नागपूर

धरमपेठ झोन

प्रभाग क्रमांक १२ : मकर धोकडा मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक १३ : हजारी पहाड, मराठी, मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक १४ : प्रियदर्शनी, मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक १५ : नेताजी मार्केट मनपा शाळा, नागपूर

हनुमान नगर झोन

प्रभाग क्रमांक २९ : योगाभवन, मनपा नागपूर

प्रभाग क्रमांक ३१ : लालबहादूर शास्त्री मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक ३२ : दुर्गानगर मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक ३४ : हनुमान मंदीर, समाज भवन, मनपा, नागपूर

धंतोली झोन

प्रभाग क्रमांक १७ : जाटतरोडी हिंदी प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक ३३ : नरेंद्र नगर यूपीएचसी, नरेंद्र नगर नागपूर

प्रभाग क्रमांक ३५ : गणेश हनुमान मंदिर, हावरापेठ नागपूर

नेहरूनगर झोन

प्रभाग क्रमांक २६ : मराठी उच्च प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक २७ : संत ज्ञानेश्वर समाज, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक २७ : नेहरूनगर झोन कार्यालय, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक २८ : राजबाळ मराठी प्राथमिक शाळा, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक ३० : गणेश मंदिर, मनपा नागपूर

गांधीबाग झोन

प्रभाग क्रमांक ८ : फुटबॉल ग्राउंड, अंसारी नगर, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक १८ : गांधीबाग झोन कार्यालय, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक १९ : हंसापुरी खदान हायस्कुल, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक २२ : अण्णाभाउ साठे वाचनालय, मनपा, नागपूर

सतरंजीपुरा झोन

प्रभाग क्रमांक ५ : सतधम्म बुदधविहार, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक २० : हिंदी प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक २१ : सतरंजीपुरा झोन कार्यालय, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक २१ : शांतीनगर प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर

लकडगंज झोन

प्रभाग क्रमांक ४ : संत कबिर मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक २३ : समाज भवन

प्रभाग क्रमांक २४ : मराठी उच्च प्राथमिक शाळा

प्रभाग क्रमांक २५ : मनपा महारानी लक्ष्मीबाई शाळा, मनपा शाळा, नागपूर

आशीनगर झोन

प्रभाग क्रमांक २ : कपिल नगर, प्राथमिक शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक ३ : समाज भवन, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक ६ : राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, दुर्गावती चौक, नागपूर

प्रभाग क्रमांक ७ : बाळाभाउपेठ, आर सी एस सेंटर, नागपूर

मंगळवारी झोन

प्रभाग क्रमांक ११ : झिंगाबाई टाकळी, मनपा शाळा, नागपूर

प्रभाग क्रमांक १ : जरीपटका नारा आरोग्य नागरी सुविधा केंद्र, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक ९ : आरोग्य नागरी सुविधा केंद्र, मनपा, नागपूर

प्रभाग क्रमांक १० : हनुमान मंदीर, पचकमेटी एकता नगर, बोरगाव, गोरेवाडा, रोड, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर मनपा ला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल टाइम रँकिंग' पुरस्कार

Sun Jul 14 , 2024
– नवी दिल्ली येथे १८ जुलैला होणार सन्मान : मनपा आयुक्तांनी केले चमूचे अभिनंदन नागपूर :- भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल टाइम रँकिंग’ (SPARK-2023-24) पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com