संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे कामठी तहसिलदारांना निवेदन
कामठी :- १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्याकरिता चिकना, भामेवाडा, आसलवाडा, जाखेगाव, वडोदा, खापा इत्यादी गावांच्या शेतपिकाची प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात इतर जनप्रतिनिधिनी व प्रशासकीय अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पाहणी करत असता असे आढळून आले की, गारपिटीमुळे चने, गहू, ऊस, मिरची पिकांचे तसेच भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा सर्वे करून, पंचनामे करून सरसकट अहवाल त्वरित पाठविण्यात यावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पिकविम्याची साईट बंद असल्याच्या तक्रारी आहेत. यावर त्वरित कारवाई करावी. अशा प्रकारचे निवेदन तहसिलदार कामठी यांना देण्यात आले.
प्रसंगी प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती म.बा.क. जिल्हा परिषद नागपूर, दिशा चणकापुरे सभापती कामठी, दिलीप वंजारी उपसभापती कामठी, आशीष मल्लेवार माजी उपसभापती कामठी, संभाजी गावंडे, अतुल बाळबुधे सरपंच केम, नंदकिशोर खेटमले माजी सरपंच, सचिन भोयर, सुधाकर ठवकर, अमोल भिवगडे, पंकज ढोरे, अर्जुन राऊत, चंद्रकांत ढोंगे, रामू डाबरे, दिनकर येंडे, शुधोधन मानवटकर, नितीन बांगडे, सीमा मानवटकर, विलास गावंडे, महेश केसरवाणी, कृष्ण गायधणे, दशरथ शेंडे, प्रदीप काळे, प्रमोद पटले, सतीश बरडे तसेच जिल्हा कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, खंड विकास अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी आणि संबंधित पटवारी, सचिव आणि कृषि सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.