नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तायक्वांडो स्पर्धेमध्ये पृथा भुडे व अवी झपाटे यांनी १४ वर्षाखालील मुली आणि मुलांच्या गटात सुवर्ण पदक पटकाविले. विवेकानंद नगर क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या विविध वजनगटात स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या ५९ किलोवरील वजनगटात यूटीडब्ल्यूच्या पृथा भुडे ने सुवर्ण, यूटीडब्ल्यूच्या आरुषी राज ने रौप्य आणि सावनेर च्या नियती जांगडे ने कांस्य पदक पटकाविले. मुलांच्या ६५ किलोवरील वजनगटामध्ये आदर्श कॉन्व्हेंटच्या अवी झपाटे ने इटीए च्या श्रेयश पिंपळे नमवून सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली. श्रेयश ला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
तायक्वांडो निकाल (सुवर्ण, रौप्य व कांस्य)
१४ वर्षाखालील मुली
२९ किलोपेक्षा कमी वजनगट : सिद्धी पडोळे (फायटर्स), पुर्वी मुलुंडे (मौदा), स्वरा गणवीर (श्रेयस कॉन्व्हेंट)
३३ किलोपेक्षा कमी वजनगट : हिमांशी मोहतुरे (अल्टिमेट), प्राची चौधरी (मौदा), कृती गणवीर (श्रेयस कॉन्व्हेंट)
३७ किलोपेक्षा कमी वजनगट : उन्नती गंगमवार (इटीए), निधी पाटील (वंदे मातरम), श्रावणी जगताप (आदर्श)
४१ किलोपेक्षा कमी वजनगट : ऋतुजा दंतलवार (यूटीडब्ल्यू), शिवानी वैद्य (यूटीए), गौरी अग्रवाल (हाय फ्लाय)
४४ किलोपेक्षा कमी वजनगट : सिद्धी मोरे (सत्यभामा), श्रीगौरी बेडेकर (इटीए), पुण्यश्री वाघाडे (आदर्श)
४७ किलोपेक्षा कमी वजनगट : परिणीता परब (वंदे मातरम), टीना वैद्य (मौदा), प्रियांशी अडकेने (एसओएस)
५१ किलोपेक्षा कमी वजनगट : ऋतुजा मालवे (एसटीए), रिद्धी सारडा (भवन्स बी.पी.), एंजल माटे (इटीए)
५५ किलोपेक्षा कमी वजनगट : वंशिका जवाने (अल्टिमेट), अवनी तोमर (यूटीडब्ल्यू), माही मोरे (इटीए)
५९ किलोपेक्षा कमी वजनगट : समृद्धी गोमासे (वंदे मातरम), संजीदा आलम (इटीए)
५९ किलोवरील वजनगट : पृथा भुडे (यूटीडब्ल्यू), आरुषी राज (यूटीडब्ल्यू), नियती जांगडे (सावनेर)
१४ वर्षाखालील मुले
३३ किलोपेक्षा कमी वजनगट : मनज्योत सिंग (यूटीडब्ल्यू), सक्षम मोंगसे (यूटीडब्ल्यू), अंश गुप्ता (यूटीडब्ल्यू)
३७ किलोपेक्षा कमी वजनगट : आर्यन पिंपळकर (यूटीडब्ल्यू), फैज शेख (सावनेर), हर्ष वडाज (यूटीडब्ल्यू)
४१ किलोपेक्षा कमी वजनगट : वेदीत चौधरी (इटीए), सोहम सातपुते (टीजीएसए), स्वराज कुंभलकर (रिव्हॉल्यूएशन)
४५ किलोपेक्षा कमी वजनगट : प्रणव भक्ते (अल्टिमेट), सत्यम बिसेन (फायटर), संघर्ष लोखंडे (आदर्श)
४९ किलोपेक्षा कमी वजनगट : दीप मैताम (आदर्श), अर्णव मेश्राम (अल्टिमेट), दिव्य सेलोकर (फायटर)
५३ किलोपेक्षा कमी वजनगट : पार्थ कुमरे (हाय फ्लाय), प्रवेश गोनमाडे (मौदा), अक्षद सावरकर (सुयश कॉन्व्हेंट)
५७ किलोपेक्षा कमी वजनगट : जनमनजय हलदुलकर (इटीए), वेद तांबे (इटीए), यश गायधने (सावनेर)
६१ किलोपेक्षा कमी वजनगट : आदी नलवाडे (इटीए)
६५ किलोवरील वजनगट : अवी झपाटे (आदर्श), श्रेयश पिंपळे (इटीए)