नागपूर :- काटोल तालुक्यातील ग्रामपंचायत खुर्सापार येथे अटल भूजल योजना व ICRISAT प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाची पाहणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केली.
अटल भूजल योजनेंतर्गत खुर्सापार या ग्रामपंचायतमध्ये , पिजोमीटर ,रिचार्ज शाफ्ट, छतावरील पाऊस पाणी संकलन, अभिसरणांतर्गत मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली, तसेच ICRISAT प्रकल्पांतर्गत लाभ दिलेल्या शेतकऱ्यांशी तसेच सरपंच सुधीर गोतमारे त्यांचे सोबत संवाद साधून शेतकऱ्यांचे तयार करण्यात आलेले, सॉईल हेल्थ कार्डचे अनावरण करण्यात आले , वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत गावामध्ये होत असलेल्या कामाबाबत समाधान त्यांनी व्यक्त केले. भेटी दरम्यान डॉ. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक चंद्रकांत भोयर, डॉ. वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्षा पी माने , भंडाराचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शिवाजी पद्मने, सहायक भूवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे, जलसंवर्धन तज्ञ दर्शन दुरबुडे, कृषी तज्ञ प्रतीक हेडाऊ यावेळी उपस्थित होते.