– नागपुरात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रम
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स (UAVs) साठी 1250 मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे.
यासोबत, नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 250 खाटांचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि अत्याधुनिक 14 ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होतील.
पंतप्रधान मोदी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘प्रतिपदा’ कार्यक्रमानिमित्त स्मृती मंदिराला भेट देऊन संघ संस्थापकांना अभिवादन करतील.