राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी किंवा महाराष्ट्राबाहेर बदली करावी – महेश तपासे

महेश तपासे यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र…

मुंबई :- राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेताल वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी राज्यपालांची हकालपट्टी करा - हेमंत पाटील

Mon Nov 21 , 2022
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे तक्रार करणार मुंबई :- महाराष्ट्राचे दैवत,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वतव्य करणारे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केली आहे.छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान करीत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पक्षेष्टींनीं पक्षातून निलंबित करण्याची मागणी देखील पाटील यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!