भूजल योजनेचे कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरण

नागपूर : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) कार्यालयाकडून अटल भूजल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील 108 व नरखेड मधिल 14 असे एकूण 122गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध विभागाच्या सहकार्याने जलसंधारणाच्या उपाय योजना राबविण्यात येत असून लोकसहभागाद्वारे समाजाच्या पाणी बचतीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देखिल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा काम करत आहे. याअनुषंगानेच माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत राज्यात अटल भूजल योजनेंतर्गत लोककलेद्वारे जनजागृती अभियान 2022 राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने रंगधून कला मंच नागपूर चे समिर दांडले व कलासंच यांच्या कलासमुहाद्वारे कोंढाळी ता.काटोल येथे जनजागृती विषयक कलापथक सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कलापथक मनोरंजनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना भूजल बचतीचे महत्व व त्यावरील उपाय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागाच्या योजनांच्या अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे, शेतकरी बांधवांसाठी कमी पाण्यातील पिक पद्धती, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणेबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम सरपंच केशव धुर्वे, यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून सदर कार्यक्रमाला आज कोंढाळी येथील बाजार असल्यामुळे कलापथकाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, व अटल भूजल योजनेअंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रकाश बहादे, माहिती शिक्षण संवाद तज्ञ तसेच क्षेत्रीय स्तरावर काम करणारी जिल्हा अंमलबजावणी भागिदार संस्थाचे भास्कर गाडरे, समुदाय संघटक यांनी प्रयत्न केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्रीय संयुक्त सचिव ने किया महा मेट्रो का दौरा

Sat Jul 23 , 2022
अन्य मेट्रो रेल परियोजना महा मेट्रो के कार्यों का अनुकरण करे : श्याम दुबे नागपुर : आज भारत सरकार के आवास एवं शहरी कार्य मंत्रालय के संयुक्त सचिव एवं वित्तीय सलाहकार एवं निदेशक-महा मेट्रो श्याम दुबे ने नागपुर मेट्रो रेल परियोजना का दौरा किया। महा मेट्रो के प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित ने मेट्रो भवन में उनका स्वागत किया और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com