नागपूर – देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने २५ डिसेंबर रोजी ‘सुशासन दिवस’ साजरा केला जातो. नागपूर शहरात सुशासन दिवस साजरा करण्याबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (ता. २४) पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी सुशासन दिन कार्यक्रमाचे विदर्भ समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीला संबोधित करताना महाराष्ट्र व विदर्भातील सर्व बूथ मध्ये श्रधेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करुन सुशासन दिन साजरा करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय भाजप सरचिटणीस तरुणजी चुघ व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनानुसार या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचे आवाहन ह्याप्रसंगी करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे होते. प्रामुख्याने विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर , प्रा. संजय भेंडे, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, शहर महामंत्री विष्णू चांगदे, संदीप गवई, रामभाऊ आंबुलकर, गुड्डू त्रिवेदी, अश्विनी जिचकार व शहर, मंडळ भाजप व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सुशासन दिन पूर्वतयारी बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये संयोजक नियुक्त करण्यात आले.