संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कर्मविर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी चे औचित्य साधून ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल कामठी तर्फे 100 विद्यार्थ्याना प्रवेश फी मध्ये सवलत
कामठी :- सन 2023 हे वर्ष कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.या ऐतिहासिक कालखंडाचे औचित्य साधून त्यांच्या जन्मशताब्दी दिनी दिनांक 22 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी कर्मवीर दादासाहेबांच्या कृतार्थ जीवनसाधनेचा गौरव करताना त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री सडक व परिवहन राजमार्ग नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,माजी खासदार प्रफुल पटेल, खासदार कृपाल तुमाने,आमदार टेकचंद सावरकर,माजी मंत्री नसीम खान , मेट्रो रेल कार्पोरेशन चे महाप्रबंधक ब्रिजेश दीक्षित,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव सुमित भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेकरिता जागा उपलब्ध करून दिली त्याच जागेवर दादासाहेब कुंभारे यांचे शिल्प उभारण्यात येणार आहे.दादासाहेबांच्या हक्काच्या जागेवरच दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सव निमित्ताने कामठी शहरात पहिल्यांदाच दादासाहेबांचे शिल्प उभारण्यात येत असल्याची माहिती हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली. ज्या ठिकाणी शिल्प उभारण्यात येणार आहे त्या जागेची पाहणी केली.या शिल्पाच्या जागेवर अप्रतिम अशी कलाकृती व सौंदर्यीकरण करण्यात येणार अशीही माहिती दिली.
कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दीचे औचित्य साधून हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था कामठी संचालित ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल कामठी तर्फे 100 विद्यार्थ्याना आज 18 मार्च 2023 पर्यंत प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येईल अशी माहिती ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल कामठीच्या प्रिन्सिपल अमरीन फातिमा यांनी दिली.