Ø शेतकऱ्यांसाठी कृषि विषयक विविध सत्र
Ø कृषि आधारीत योजनांची माहिती मिळणार
Ø सांस्कृतिक कार्यक्रम, संगित रजनी व किर्तन
यवतमाळ :- आत्मा, कृषी विभाग व माविमच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 10 मार्च या कालावधीत समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे कृषिविषयक सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच रोज सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम, संगित रजनी व किर्तन होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते दि.6 मार्च रोजी दुपारी 1 वाजता होईल.
पहिल्या दिवशी सायंकाळी 7 वाजता येथील कवी जयंत चावरे यांचा हसू आणि आसू हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दि.7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा.विजय इलोरकर यांचे बांबूची व्यवसायिक लागवड व मूल्यवर्धन, दुपारी 12 वाजता राहुल बोळे यांचे सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, दुपारी 12.45 वाजता डॅा.संतोष चव्हाण यांचे बांधावरील जैविक प्रयोगशाळा, दुपारी 2 वाजता वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांचे मानव वन्यजीव संघर्ष, दुपारी 3 वाजता कृषि अधिकारी अनिल राठी यांचे पौष्टीक तृणधान्य या विषयावर मार्गदर्शन तर सायंकाळी 7 वाजता यवतमाळ येथील सुप्रसिद्ध बाल गायिका छोटे उस्ताद विजेती गीत बागडे हिचा संगीत रजनीचा कार्यक्रम होईल.
दि.8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर बिचेवार यांचे रेशीम शेती अनुभव कथन, दुपारी 12 वाजता पुणे येथील हेमंत जगताप यांचे संरक्षित शेती तंत्रज्ञान, दुपारी 1 वाजता सारंग नेरकर यांचे एआय तंत्रज्ञान, दुपारी 2 वाजता डॅा.संजय काकडे यांचे अतिघनता कापुस लागवड तंत्रज्ञान, दुपारी 3 वाजता दिपक झंवर यांचे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, दुपारी 3.30 वाजता रामेश्वर बिचेवार यांचे हळद प्रक्रिया व मार्केटींग, सायंकाळी 4 वाजता प्रविण वानखेडे यांचे शेतमाल निर्यात संधी या विषयावर मार्गदर्शन तर सायंकाळी 7 वाजता संदीपपाल महाराज यांचे समाजप्रबोधन किर्तन होईल.
दि.9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शास्त्रज्ञ डॅा.बाबासाहेब फंड व डॅा.शैलेश गावंडे यांचे कृषी किर्तन, दुपारी 12 वाजता डॅा.प्रमोद बकाने यांचे कृषि प्रक्रीया अभियांत्रिकी, दुपारी 1 वाजता आशिष मुळावतकर यांचे सेंद्रीय कृषिमाल विपणन व संधी करार शेती, दुपारी 2 वाजता अभिनव शाह यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी 2.30 वाजता महेंद्र ढवळे यांचे रेशीम शेती, दुपारी 3 वाजता देवानंद खांदवे यांचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे खरेदीदार विक्रेते या विषयावर मार्गदर्शन व सायंकाळी 7 वाजता अक्षय गहुकार व संच यांचे काव्य संमेलन होणार आहे.
शेवटच्या दिवशी दि.10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता रोहन धांडे यांचे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी करिता वायदे बाजाराची ओळख, दुपारी 12 वाजता पशुसंवर्धन उपायुक्त डॅा.विजय रहाटे यांचे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना, दुपारी 1 वाजता जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॅा.क्रांती काटोले यांचे राज्य पुरस्कृत पशु आधारीत शासकीय योजना, दुपारी 1.30 वाजता शेतकरी विठ्ठल पाटील, गणेश चेमलेवार, आनंद गोविंदवार यांचे शेतीतील अनुभव कथन, दुपारी 2.30 वाजता डॅा.विजय माने यांचे अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन तर दुपारी 3 वाजता कृषि महोत्सवाचा समारोप होईल.
या पाच दिवशीय कृषी महोत्सवामध्ये विविध शासकीय योजनांचे दालन, कृषी संलग्न यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन तसेच इतर कंपन्यांची दालने, धान्य महोत्सव व शेतमाल विक्री केंद्र, सेंद्रीय शेतमाल फळे विक्री, प्रक्रिया युक्त पदार्थ या व्यतिरिक्त शहरातील ग्राहकांसाठी खाणावळींचे दालन, महिला बचत गट दालने व विविध प्रदर्शनी राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.