जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीला वेग

– जिल्ह्यात 17 ते 19 दरम्यान जानेवारीला तीन दिवस प्रयोग

रेल्वे ग्राऊंडवर होणार महानाट्य 

भंडारा :- जिल्हा प्रशासनामार्फत 17, 18 व 19 जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून या संदर्भात तयारीला सुरुवात झाली असून आज याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बैठक घेतली.यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी लीना फलके , स्थानिक समन्वयक आनंद जावडेकर उपस्थित होते.

या महानाट्यासाठी स्टेज, व अन्य अनुषंगिक व्यवस्था यांचा आढावा त्यांनी घेतला.इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग रेल्वे ग्राऊंडवर होणार आहे.

350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून होणार आहे.

350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील दुसरा प्रयोग भंडारा येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा ‘ मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व नगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज सायंकाळी पाच वाजतानंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण कलाकार करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेच्या नोंदणीस ९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Tue Jan 9 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवात यंदा ॲथलेटिक्स स्पर्धांचे विदर्भस्तरीय आयोजन करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा १३ ते १६ जानेवारीदरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सिंथेटिक ट्रॅकवर होणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली असून मंगळवार ९ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com