अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची पाहणी मृताच्या कुटुंबियास  चार लाख देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा लोकप्रतिनीधी व शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे- सुनील केदार

 नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या हेमंत रोशन निवते यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे आस्थापूर्वक विचारपूस करुन सांत्वन केले. मृत मुलगा दुग्ध वाटपाचे काम करत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियास पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून गाय व म्हसी देण्यासोबत सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली.

शासकीय योजनेतून गुरांचा गोठा मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या. त्यासोबत पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आकस्मित निसर्गाचा कोपामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यशासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. राज्य शासनातर्फे मदतीचा हात नक्कीच मिळेल. सर्वे करतांना शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे,त्यांना मदत करा. त्यासोबत ग्रामीण भागातील गरीब व झोपडीपटीतील लोकांचेही नुकसान झाले आहे. त्याचाही  सर्वे करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, व ग्रामपंचाय सदस्यांनी या कामात शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी सहकार्य करावे. लोकप्रतिनीधी व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे,  असे आवाहन त्यांनी केले. 

            या दौऱ्यात त्यांनी  नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमथी, लोणखैरी, सावनेर तालुक्यातील दहेगाव(रं), पारशिवणी तालुक्यातील  इटगांव, भागीमहारी, रामटेक तालुक्यातील जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या गावातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हानी झालेल्या शेतांची पाहणी केली.

          जिल्ह्यात जवळपास 7 हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर,उ्न्हा ळी भुईमुग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8 हजार 334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.

          या भागाचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार असून त्याची नुकसानभरपाई आपतग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल, असे सांगून  शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठिशी अशी ग्वाही  श्री. केदार यांनी दिली.

या दौऱ्यात त्यांचेसमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जि.प.  सदस्य कुंदा राऊत, प्रकाश खापरे, राजु कुसुबे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश  भोयर तसेच पंचायत समितीचे सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नायलॉन मांजाचा वापर टाळा, दुचाकी वाहनचालकांनी काळजी घ्यावी : पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांचे आवाहन

Fri Jan 14 , 2022
नागपूर  :   मकरसंक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचे आवाहन केलेले आहे. पतंग उडविण्याचा आनंद ही या सणाची पर्वणी. मात्र, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांनी भीतीचे वातावरण निर्माण होते. नायलॉन मांजावर बंदी आहे व पोलीस प्रशासन कायदेशीर कार्यवाही करीत आहेत. मात्र जनसहभागाशिवाय ही समस्या संपणार नाही. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपल्या आसपास नायलॉन मांजाची विक्री निदर्शनास आल्यास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com