संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व कामठी पंचायत समिती अंतर्गत प्रशांत महल्ले व तनु गभने यांची दिल्ली येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमासाठी निवड झाली असून ते कामठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हातील ग्रामस्तरावर 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अमृत कलश यात्रा काढून घरोघरी माती गोळा करण्याचा कार्यक्रम नेहरु युवा केंद्र व पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात आला होता दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून साडे सात हजार कलशातील माती सोबत घेत अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे.ही ‘ अमृत वाटिका एक भारत श्रेष्ठ भारत ‘ या वचनपूर्ती चे प्रतीक आहे.शुक्रवारी क्रांती मैदान मुंबई येथे कार्यक्रम पर पडला.३१ नोव्हेंबर ला अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे होणार आहे.या सोहळ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत कामठी तालुक्याचे प्रतिनिधित्व प्रशांत महल्ले व तनु गभने करणार आहेत.कामठी पंचायत समिती येथून बुधवारी गटविकास अधिकारी प्रदीप गायबोले यांच्या हस्ते कलश सोपविण्यात आले.त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हातील सर्व प्रतिनिधींना मुंबई येथे रवाना होण्यासाठी हिरवी झेंडी दाखविली.यावेळी जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य संजय राऊत व प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधीसह प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते..