– संदीप कांबळे,कामठी
कामठी – शालेय शिक्षण विभाग व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय आज दि ४/३/२२ रोजी सकाळी १०.३० वाजता इयत्ता १२ विचा इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत सुरू झाला या केंद्रावर एकूण विद्यार्थी १०७२ प्रविष्ट झाले.
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर करोना प्रवेश देताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून घेण्यात आले. प्रवेशपत्रासोबत फेस मास्क, हँड सॅनिटायझर करून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आले.
महाराष्ट्र बोर्डाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र HSC)परीक्षा ०४ मार्च २०२२ पासून सुरु झाली. . एचएससी म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे.
बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यानुसार सकाळी १०.३० ते २ आणि दुपारी ३ ते ६.३० या वेळेत परीक्षा होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी साधारण १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या ३० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे,असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी बागडे केंद्रासंचालक प्रा सुनीता भौमिक व पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी सांगितले आहे.