मतदान केंद्र सुसूत्रीकरणासंदर्भात वस्तुनिष्ठ आक्षेप राजकीय पक्षांनी सादर करावेत – जिल्हाधिकारी

– प्रारूप यादी निवडणूक कार्यालयामध्ये उपलब्ध

नागपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम सुरू आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या अधिकृत ई-मेल वर यासंदर्भातील प्रारूप यादी पाठविण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी वस्तुनिष्ठ आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे केले.

ब्लॉक व तालुका स्तरावरील राजकीय पक्षांच्या बैठकांनंतर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत आज जिल्हा निवडणूक विभागाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 12 विधानसभा क्षेत्रासंदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला 12 विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रभारी उपस्थित होते.

या बैठकीला रमेश दलाल प्रकाश बारोकर, बंडोपंत टेंभुर्णे, सचिन तिरपुडे, किशोर गजभिये, सचिन मठाले, प्रवीण शर्मा, शुभम नवले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात दीड हजारापेक्षा जास्त मतदार असतील अशा केंद्रासंदर्भात आवश्यक बदल व अन्य बाबी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याबाबतची सूचना केली होती. आजच्या बैठकीत या संदर्भातील प्रारूप तयार असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही सुधारणा असल्यास सुचविण्याची विनंती निवडणूक विभागामार्फत करण्यात आली. उप निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी यावेळी बैठकीचे सूत्रसंचालन केले. उद्या 22 तारखेला निवडणूक विभागाचे कार्यालय सुरू असून उद्या देखील राजकीय पक्षांना प्रारुप यादी बघता येणार आहे. त्यानंतर निवडणूक विभागाला जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी कळविली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुकंपा पदभरतीसाठी विशेष मोहिम राबवा - विजयलक्ष्मी बिदरी

Fri Sep 22 , 2023
Ø अनुकंपाच्या 500 जागा भरण्याचे उद्दिष्ट्य Ø पदभरतीबाबत 70 विभागांचा आढावा नागपूर :- अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. विभागीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com