संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या संकल्पनेतून आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ‘पोलिस दलावर महिला पोलिसांचे कंट्रोल’या अभिनव उपक्रमा अंतर्गत स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे एक दिवसाचा कारभार एक दिवसाची पि आय म्हणून पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे यांना पदभार देण्यात आला.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे,एपीआय जितेंद्र ठाकूर,किशोर मालोकर,महिला पोलीस कर्मचारी माया अमृ,रुपाली साकोरे,ज्योती सहारे, मनीषा मानकर, दुर्गा भगत, आदी उपस्थित होते.
जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या अध्यक्षतेखाली 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने पार पडला असून कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यानंतर एक दिवसाची महिला पी आय कल्पना कटारे,सहकारी उपस्थित महिला पोलीस कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत सफाई कर्मचारी मंदा चवरे व प्रमुख पाहुणे विद्या भीमटे, सेवानिवृत्त शिक्षिका किरण मेश्राम, दक्षता समितीच्या समस्त सदस्यगण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले की भारतीय संस्कृतोत महिलांना देवीचे स्थान असून त्यांना पुज्यनिय ठरविले आहे तेव्हा समाजामध्ये महिलांचा आदर सम्मान वाढलाच पाहिजे. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत निराधार महिलांना आधाराचे स्थान मिळावे यासाठी समाजाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.कार्यक्रमाचे संचालन महिला पोलीस कर्मचारी माया अमृ यांनी केले तर आभार रुपाली साकोरे यांनी मानले.