संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नागरिकां मध्ये कायदेशीर जागृती निर्माण करून त्यांना नव्या कायद्यांची संपुर्ण माहिती मिळावी तसेच कायद्यांचे महत्त्व समजावे यासाठी कन्हान पोलीस विभागाच्या वतीने दोन दिवसीय जनजागृतीपर कार्यशाळा कन्हान-पिपरी नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली.
बुधवार (दि.०५) व (दि.०६) फेब्रुवारी २०२५ ला नविन कायद्याचे जनजागृतीपर दोन दिवसीय कार्य शाळेत राजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक पो. स्टे.कन्हान हयानी प्रास्ताविकातुन कायद्यांचे नागरिकांच्या जीवनातील महत्त्व विषद केले. नविन कायदे का आणि कसे लागु करण्यात आले याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अंजना भिवगडे, सरकारी सहायक अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय कामठी यांनी नविन कायदे १) भारतीय न्याय संहिता २०२३, २) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, ३) भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या तीन नव्या कायद्यांमध्ये झालेल्या महत्त्वपुर्ण बदलांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाने नाग रिकांना सुरक्षेचे महत्त्व पटवुन देत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घ्यावे असे आवाहन केले. नागरिकांनी कायद्यांची माहिती, कायदे समजुन घेतल्यास स्वतःचे व समाजाचे संरक्षण शक्य आहे. असा महत्त्वपुर्ण संदेश देण्यात आला. नव्या कायद्यात गुन्हेगारांवर कठोर कारवाईची तरतुद असुन दैनंदिन जीवनातील सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. कायद्यांचे योग्य आकलन झाल्यास नागरिकांची फसवणुक, गुन्हेगारी कृत्ये व इतर कायदेशीर अडचणीं पासुन स्वतःचे संरक्षण करू शकाल. या कायद्यांमुळे महिलांचे संरक्षण, गुन्हेगारी प्रवृत्ती रोखणे, सायबर क्राईमवर कठोर कारवाई आणि न्याय प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवणे शक्य होणार आहे. सदर कार्यशाळेत पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील पत्रकार, नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक, अंगनवाडी सेविका, मदतनिस, महिला दक्ष ता समिती सदस्य सह मान्यवर उपस्थित होते. पोलीस कर्मचारी आतिश मानवटकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.