पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

 मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            विधानपरिषदेत नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था विषयक प्रस्तावावर उत्तर देताना श्री. देसाई बोलत होते. श्री. देसाई म्हणाले कीराज्यातील आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिस दलावर कोरोनाच्या काळात कामाचा ताण पहायला मिळाला. कोरोनामुळे पोलिस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी बाधित झाले. कोरोना काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोलिस दलाने अत्यंत चांगले काम केले आहे. पोलिस दलावरील मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी महिलांना आठ तास ड्युटी करण्यात आली असल्याचे श्री. देसाई यांनी सभागृहात सांगितले.

            पोलिस दलातील अधिकारी व कर्मचा-यांना चांगली घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणजे २०१९-२०२० मध्ये पोलिस दलाला घरकुलासाठी २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. २०२० -२१ मध्ये ४०० कोटी रुपये२०२१-२०२२ मध्ये ८०० कोटी तर २२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलिसांसाठीच्या घरांसाठीची तरतूद एक हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच पोलिस दलास चांगल्या दर्जाची दुचाकी व चारचाकी वाहने उपलब्ध करून दिली असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

            आरोग्यम्हाडाशिक्षण विभागातील पेपरफुटीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईलअसे प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. देसाई यांनी सांगितले.

            पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १२ हजार ५०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ७२३१ पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरसदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकरनिरंजन डावखरेप्रवीण दटके आदी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पेटीएम बैंक पर आरबीआई सख्त

Tue Mar 15 , 2022
मुंबई – भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने बीते शुक्रवार को पेटीएम पेमेंट्स बैंक (पीबी) को नए ग्राहक जोडऩे से रोक दिया था, जिसकी प्रमुख वजह अपने ग्राहक को जानें (KYC) और, धनशोधन नियमों का उल्लंघन है। कई सूत्रों ने बिज़नेस स्टैंडर्ड को इसकी जानकारी दी। बैंकों से नया ग्राहक बनाने से पहले उसकी विस्तृत जांच-परख करने की उम्मीद की जाती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com