गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतून व मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. अनुज तारे सा., यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व स्तरातील दिव्यांग व्यक्तींेचा महामेळावा गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या वतीने व समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या सहकार्याने आज दिनांक 13/12/2021 रोजी एकलव्य हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पार पडला.
सदर दिव्यांग महामेळाव्यात 610 दिव्यांग नागरिक हजर होते. 610 दिव्यांगांचे मोफत युडीआयडी प्रमाणपत्राकरीता तसेच 610 दिव्यांगांचे मोफत बस सवलत कार्ड करीता फार्म भरुन घेण्यात आले. त्यापैकी 40 दिव्यांगांना मोफत बस सवलत करीता कार्ड काढून देण्यात आले. ज्या दिव्यांगांना युडीआयडी कार्ड काढून दिले, त्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेचा लाभ गडचिरोली पोलीस दलाकडून मिळवून देण्यात येणार आहे तसेच ज्या दिव्यांग नागरिकांना गंभीर आजार होते, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. आतापर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 328 दिव्यांग प्रमाणपत्र व 312 बस सवलत कार्ड काढून देण्यात आले असून, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना यांचे 135 प्रस्ताव संबंधीत तहसिल कार्यालयाला पाठवून 93 प्रस्ताव मंजुर झाले आहेत. मंजुर प्रकरणाच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी दरमहा 1200/- रूपये शासकीय लाभ मिळत आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. यांचे हस्ते दिव्यांगांना युडीआयडी बस सवलत कार्ड वाटप करण्यात आले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, महाराष्ट्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत परंतु गडचिरोली सारख्या भागात रस्ते व वाहतुकीची सोय नसल्याने त्या लोकांपर्यंत पोहचवण्यास अडचण येते. त्या योजना आदिवासी नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता पोलीस विभाग त्या ठिकाणी या योजनांची माहीती पोहचवतात व फक्त योजनांची माहीती देणे एवढेच कर्तव्य नसुन त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहीजे यासाठी सदैव प्रयत्न करतात. गडचिरोली जिल्हयातील शेवटच्या दिव्यांगापर्यंत जोपर्यंत शासनाचा लाभ पोहचत नाही, तोपर्यंत गडचिरोली पोलीस दलाचे हे कार्य सुरुच राहील.
सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. अनुज तारे सा.,मा. डॉ. अनिल रूडे सा. (जिल्हा शल्य चिकित्सक जि. सा. रू. गडचिरोली), मा. डॉ. सोळंखी (अति. जिल्हा शल्य चिकित्सक जि. सा. रू. गडचिरोली), मा. डॉ. इंद्रजीत नागदेवते (फिजीशयन), मा. डॉ. मनिष मेश्राम (मानसिक रोग तज्ञ), मा. डॉ. सतिश मेश्राम (अस्थिरोग तज्ञ), मा. डॉ. सुमित मंथनवार (नेत्ररोग तज्ञ), मा. डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ), मा. डॉ. अजय कांबळे (कान,नाक,घसा तज्ञ), मा. डॉ. अजय मोरे (भौतिकोपचार तज्ञ), मा. निलेश तोरे (समाज कल्याण निरीक्षक जि.प. गडचिरोली), मा. मंगेश पांडे (आगार व्यवस्थापक रा.प.महा. विभाग गडचिरोली), मा. मिलींद रामटेके (मुख्य वैद्यकीय अधिकारी पोलीस रूग्णालय गडचिरोली) हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. महादेव शेलार व त्यांचे सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
सतीश कुमार गडचिरोली