नागपुर – नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर येथील ऑडिटोरीयम हॉलमध्ये नागपूर शहर आयुक्तालयातील बलात्कारासह पोक्सो, आर्थिक गुन्हयांचे तपासासंदर्भात तांत्रीक पुरावे संकलन, विश्लेषण इत्यादी बाबत दोश सिध्दीचे प्रमाण वाढविण्याचे दृश्टीने ठाकरे, उपसंचालक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर व त्यांचे अधिनस्त असलेले पारंगत अधिकारी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संबोधन व मार्गदर्शन करीता कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेमध्ये पोलीस आयुक्त, नागपूर शहरचे अमितेश कुमार,सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) सुनिल फुलारी यांनी उपस्थित सर्व तपासी अधिकारी व त्यांचे लेखनिक अंमलदार यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ठाकरे उपसंचालक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांनी घडलेल्या गुन्हयासंबधी पुरावे प्राप्त करणे पासून ते दोश सिध्दीपर्यत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांचे अधिनस्त असलेले पारंगत अधिकारी यांनी सुध्दा विविध विशयावर मोलाचे मार्गदर्शन केल .सदर कार्यशाळेला पोलीस आयुक्त नागपूर शहरचे अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे ) सुनिल फुलारी,अपर पोलीस आयुक्त (उत्तर) नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) चिन्मय पंडीत,पोलीस उपायुक्त (परि.क्र1) लोहीत मतानी, पोलीस उपायुक्त (परि.क्र 2) विनिता साहु, पोलीस उपायुक्त (परि.क्र3) गजानन शिवलिंग राजमाने, पोलीस उपायुक्त (परि.क्र 4) नुरूल हसन, पोलीस उपायुक्त (परि.क्र 5) मनिश कलवानिया, पोलीस उपायुक्त(आर्थिक) अक्षय शिंदे , पोलीस उपायुक्त(सायबर) चेतना तिडके, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संदीप पखाले, तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त,वरिश्ठ पोलीस निरिक्षक, तपासी अधिकारी, लेखनिक अंमलदार हजर होतेसदर कार्यशाळेचे आभार प्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे) रोशन पंडीतयांनी केले