संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरात बकरी ईद यंदाही साजरी करण्याच्या दृष्टीने पोलिस व नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून आपण सर्वांनी यंदाची बकरी ईद आनंदामध्ये साजरी करूया,असे आवाहन नागपूर शहर पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी काल 11 जून ला बकरी ईद निमित्त नवीन कामठी,जुनी कामठी,यशोधरा नगर,कपिल नगर पोलीस स्टेशनची कामठी येथील भाटिया सभागृहात आयोजित संयुक्त शांतता बैठकित उपस्थिताना केले. यावेळी जॉईंट महिला पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, नॉर्थ रिजन, साऊथ रिजन ,पोलीस उपायुक्त विशेष शाखा,परिमंडळ क्र 3 चे पोलीस उपायुक्त, डिटेक्शन सहाय्यक पोलिस आयुक्त जरीपटका विभाग तसेच कामठी विभाग,नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,जुनी कामठी चे पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे,इतर पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी संदीप बोरकर, महावितरण अभियंता राठोड,पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रदीप गावंडे,तसेच नागपूर महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
बकरी ईदनिमित्त कामठी येथील भाटिया फॉर्म येथे आयोजित केलेल्या संयुक्तिक बैठकीत बोलतांना पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल पुढे म्हणाले की, कामठी नागपूर शहरातील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार आपण सर्वांनी हा सण आनंदात साजरा करायचा आहे.शहरातील सलोख्याचे वातावरण गढूळ होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, तसेच सोशल मीडियाचा वापर सतर्क राहून करावा,अफवांवर विश्वास ठेवुन त्याचा प्रचार करू नये तसेच सध्या समाजामध्ये तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात कशी पडत आहे आणि त्यापासून कसे परावर्त करावे, याबाबत मार्गदर्शन केले.तसेच जातीय सलोखा राखणे तसेच मुलांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण याबाबत सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केले.
नियमानुसार स्लॉटर हाऊस मध्येच कत्तल करण्यात येईल,कोणीही स्लॉटर हाऊस सोडून बाहेर कत्तल करणार नाही ,वेस्टेज मास हे नगर परिषदेने ठेवलेल्या गाडीमध्येच टाकले जाईल ,उघड्यावर टाकले जाणार नाही,ज्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. महापालिका,नगरपालिका पोलीस प्रशासन बकरी ईद साजरी करण्यास पुर्णपणे सज्ज झाली असल्याचे डीसीपी निकतेन कदम यांनी यावेळी सांगितले.
या आढावा बैठकीस 40 ते 50 मस्जिद चे पदाधिकारी शहरातील मुस्लिमधर्मीय बांधव, व्यापारी, मशिदींचे मौलाना, शांतता समिती सदस्य आदी उपस्थित होते.