नवी दिल्ली :-45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन केले.
एक्सवील पंतप्रधानांच्या संदेशात म्हटले आहेः
“ आपल्या बुद्धिबळ चमूने 45 व्या #FIDE Chess Olympiad मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! भारताने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले आहे. आपल्या पुरुष आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन. या उल्लेखनीय कामगिरीने भारताच्या क्रीडाक्षेत्राच्या वाटचालीतील एक नवा अध्याय लिहिला आहे. या यशापासून बुद्धिबळ प्रेमींच्या भावी पिढ्यांना या खेळामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळू दे.”