स्मार्ट सिटीच्या ‘होम स्वीट होम’ परिसरात वृक्षारोपण

– सीईओ सौम्या शर्मा यांनी केले आईच्या नावाने वृक्षारोपण

नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ आणि ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमांतर्गत प्रकल्पबधित नागरिकांसाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘होम स्वीट होम’ परिसरात मंगळवारी (ता.१) वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी त्यांच्या आई डॉ. लीना शर्मा यांच्या नावाने आंब्याच्या रोपट्याची लागवड केली.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या अंतर्गत परिसरात स्वच्छता करण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेच्या माध्यमातून आईच्या नावाने एक झाड लावून कायमस्वरूपी स्मृती निर्माण करणे, हा उद्देश आहे. या अभियानाद्वारे पर्यावरणाचे रक्षण होतेच शिवाय हिरवेगार आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी हातभार देखील लागतो आहे. आई आणि निसर्ग हे दोन्ही जीवनातील मौलीक आधार असून या उपक्रमाच्या सन्मानार्थ सौम्या शर्मा चांडक यांनी वृक्षारोपण केले.

स्मार्ट सिटीच्या मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, कंपनी सचिव  भानुप्रिया ठाकूर, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर, ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख डॉ. शील घुले, नगर रचना विभाग प्रमुख राहुल पांडे, पुनर्वसन विभाग प्रमुख ओमप्रकाश लांडे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, मोबिलिटी विभागाचे श्री. मोईन हसन, अधिक्षक परिमल इनामदार आणि निवासी संकुल येथील रहिवासी नागरिकांनी सुद्धा आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लावले.

यापूर्वी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी श्री राजे छत्रपती स्मार्ट सिटी उद्यान, शिव शक्ती नगर येथे स्वच्छता केली. अधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या हातात झाडू घेऊन पाला-पाचोळा , प्लास्टिक गोळा करून स्वच्छता केली.

या प्रसंगी स्मार्ट सिटीच्या मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ प्रणिता उमरेडकर, ई गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख डॉ शील घुले, नगर रचना विभाग प्रमुख राहुल पांडे, पुनर्वसन विभाग प्रमुख ओमप्रकाश लांडे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, मोबिलिटी विभागाचे मोईन हसन, अधिक्षक परिमल इनामदार, आलोक महाजन, अशोक पाटील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IDBI बँकेच्या CSR फडातून सहयात्री फाऊडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने जी.एम. बनातवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 50 डेस्क बेंचचे लोकार्पण सोहळा

Wed Oct 2 , 2024
नागपूर :- आयडीबीआय बँकेच्या हीरक महोत्सवी समारंभाचा एक भाग म्हणून, नागपूर महानगर पालिकेच्या जी.एम. बनातवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 50 डेस्क बेंचचे उद्घाटन आणि हस्तांतरण हा उपक्रम आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रम अंतर्गत सह्याद्री फाउंडेशन एनजीओ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, शासकिय शाळांमध्ये वंचित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयडीबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com